रत्नागिरी/चिपळूण: कोकणातील विद्यार्थ्यांना अद्ययावत आणि व्यावसायिक संगणक प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने रत्नागिरी येथे सन २००१ मध्ये स्थापन झालेल्या IBS COMPUTERS ने आता आपल्या विस्ताराला सुरुवात केली आहे. रत्नागिरीतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी केल्यानंतर आता चिपळूण येथे संस्थेची दुसरी शाखा सुरू करण्यात आली आहे.
गरज रत्नागिरीची, संधी जगभरातील
संस्थेचे संस्थापक ॲड. अमित मधुकर नागवेकर यांनी २००१ मध्ये IBS COMPUTERS ची मुहूर्तमेढ रोवली. रत्नागिरीत प्रोफेशनल संगणक प्रशिक्षणाची सुविधा नसल्याने येथील शेकडो विद्यार्थ्यांना मुंबई-पुणे येथे जावे लागत असे. ही अडचण दूर करण्यासाठी ॲड. नागवेकर यांनी रत्नागिरीतच सर्व ‘अँडव्हान्स’ संगणक कोर्सेस उपलब्ध करून दिले. आजपर्यंत संस्थेने अनेक विद्यार्थ्यांना देश-विदेशात नोकरीच्या संधी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
चिपळूणमध्ये दुसऱ्या शाखेचे थाटात उद्घाटन
संस्थेचा विस्तार वाढत असल्याने तसेच बाहेरील तालुक्यातील विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन आता IBS COMPUTERS ने संपूर्ण राज्यात शाखा विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे. यातील दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची शाखा चिपळूण येथे सुरू करण्यात आली आहे.
११ नोव्हेंबर २०२५ रोजी या नवीन शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. शिवसेनेचे नगरसेवक आणि माजी सभापती श्री. उमेशजी सकपाळ आणि डी. बी. जे. कॉलेजचे प्राचार्य श्री. माधवराव बापट यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण चिपळूणमध्ये
यावेळी, चिपळूण शाखेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (A.I.), सायबर सिक्युरिटी आणि क्लाउड कम्प्यूटिंग सारखे काळाची गरज असलेले अत्याधुनिक कोर्स सुरू केल्याबद्दल IBS चे संस्थापक श्री. अमित नागवेकर आणि चिपळूण शाखेचे संचालक श्री. राज चव्हाण यांचे उपस्थितांनी विशेष अभिनंदन केले.
तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना तयार करणाऱ्या या प्रयत्नांबद्दल सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आणि IBS COMPUTERS च्या पुढील वाटचालीस भरभरून यश मिळो अशी सदिच्छा व्यक्त केली. यामुळे आता चिपळूण आणि आसपासच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे संगणक प्रशिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:01 12-11-2025














