संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराने गाईला जोरदार धडक दिल्याने या अपघातात गायीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकींवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून संगमेश्वरच्या दिशेने योगेश रामदास चव्हाण (वय 30 सातारा, सध्या राहणार वांद्री), रोहित मोहन चव्हाण (वय 25 सातारा सध्या राहणार वांद्री) दुचाकीवरून येत असताना धामणी येथील अथर्व क्लीनिक च्या समोर रस्त्यावर अचानक गाय आडवी आल्याने दुचाकी चालक घाबरून गेल्याने चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी थेट गाईला जाऊन धडकली. यात दुचाकीवरील दोघेजण रस्त्यावर पडले. दुचाकीची गाईला बसलेली धडक एवढी जबरदस्त होती की गाय काही अंतरावर पडली व तेथेच ठार झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 12/Nov/2025














