मोठी बातमी! रत्नागिरी भाजपमध्ये निवडणुकीसाठी नवी मोट!

रत्नागिरी: आगामी नगर पालिका निवडणुकीच्या (स्थानिक स्वराज्य संस्था) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) रत्नागिरीमध्ये महत्त्वपूर्ण संघटनात्मक फेरबदल केले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, रत्नागिरीमध्ये दोन प्रमुख नेत्यांची ‘संयोजक’ (Convener) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सचिन वहाळकर यांची रत्नागिरी नगर परिषद संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तर दीपक पटवर्धन यांच्यावर रत्नागिरी दक्षिण जिल्हा संयोजक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष पद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर, नगर पालिका निवडणुकीची तयारी प्रभावीपणे करण्यासाठी ही महत्त्वाची पाऊले उचलण्यात आली आहेत.
या नियुक्ती पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, ही पदे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात निर्माण करण्यात आली आहेत. याचा अर्थ निवडणुकीच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.
भाजपने ही नवी मोट बांधल्याने, आगामी नगर परिषद निवडणुकीत जोरदार तयारी करण्याची चिन्हे दिसत आहेत.