रत्नागिरी : तालुक्यातील नाणीज येथील सार्वजनिक रस्त्यावर मद्यप्राशन करणाऱ्या प्रौढाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वा. सुमारास करण्यात आली. सचिन शांताराम भायजे (४२, रा. चोरवणे, भायजेवाडी संगमेश्वर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
त्याच्या विरोधात पोलिस शिपाई सूर्याजी पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी संशयित हा नाणीज जुनामठ ते नाणीज तळवाडी जाणाऱ्या रस्त्यावर विना परवाना मद्यप्राशन करत होता. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 13/Nov/2025













