रत्नागिरी : शहरालगतच्या नाचणे शांतीनगर येथे आईचा खून केल्याचा आरोप असलेल्या संशयित मुलाची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली. अनिकेत शशिकांत तेली (रा. शांतीनगर नाचणे, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. मागील दोन महिन्यांपासून कारागृहात असलेल्या अनिकेत याने जामीनासाठी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होता. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली.
गुन्ह्यातील माहितीनुसार अनिकेत हा त्याची आई व आजी यांच्यासोबत नाचणे शांतीनगर येथील घरी वास्तव्य करत होता. तर त्याची चुलती ही शेजारी रहावयास असते. २५ ऑगस्ट रोजी रात्री अनिकेत याने स्वयंपाक घरातील धारधार चाकूने झोपेत असलेल्या आई पूजा शशिकांत तेली (५०) हिचा गळा चिरून खून केला. तसेच अनिकेत याने स्वतःच्या हातावर वार करत ड्रेनेज क्लिनर प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. अशी नोंद शहर पोलिसांत करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी अनिकेत याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 13/Nov/2025














