Chiplun Walawalkar Hospital : डेरवण येथे १५, १६ नोव्हेंबरला मेंदू स्कॅन, स्ट्रोक शिबिर

चिपळूण : डेरवण येथील वालावालकर रुग्णालयात १५ व १६ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदाच सेरेब्रल अँजिओग्राफी व स्ट्रोक व्यवस्थापन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी मुंबई येथील डॉ. नितीन डांगे (संचालक व विभागप्रमुख, इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजी व स्ट्रोक), डॉ. कुशल भाटिया (सल्लागार मेंदू आणि मणक्याचे इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजी व स्ट्रोक), डॉ. मयूर घरात (सल्लागार, इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजी व स्ट्रोक) इत्यादी तज्ज्ञ डॉक्टर्सची टीम रुग्णालयात येणार आहे. रेडिओलॉजी विभाग व न्यूरोसर्जरी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले जाणार आहे.

या शिबिराबद्दल माहिती देताना प्रमुख रेडिओलॉजिस्ट डॉ. नेताजी पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना वेळेत मेंदू स्कॅन किंवा स्ट्रोक उपचार मिळत नाहीत म्हणून वालावलकर रुग्णालयाने हे शिबिर आयोजित केले आहे. पूर्वी अशा क्लिष्ट जोखमीच्या शस्त्रक्रिया केवळ मुंबई किंवा पुणे याठिकाणी केल्या जात होत्या. आता वालावलकर रुग्णालात अशा क्लिष्ट शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत केल्या जाणार आहेत. तरी कोकणवासियांनी अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 13/Nov/2025