चिपळूण : लोटे औद्येगिक वसाहतीमधील नाल्यांमध्ये पावसाचा फायदा घेत आपल्या उद्योगातील रासायनिक सांडपाणी सोडल्याच्या गंभीर तक्रारीनंतर अखेर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मंडळाकडून वसाहतीमधील सात उद्योगांना नोटीस देण्यात आल्या असून एका मोठ्या उद्योगाविरुद्धच्या कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
काही दिवसांपूर्वी नाल्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. यानंतर स्थानिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, खेड पोलिस ठाण्यात काही कारखान्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित उद्योगांची चौकशी केली. यानंतर कोल्हापूर येथील मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे अहवाल गेल्यानंतर तेथून कारखान्यांना प्रस्तावित आदेश बजावण्यात आले आहेत.
काहींना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. यातील एका कारखान्याला यापूर्वी नोटीस बजावली असतानाही पुन्हा या कारवाईत तो सापडल्याने त्यांच्या विरोधातील प्रस्ताव हा वरिष्ठ स्तरावर पाठवला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 13/Nov/2025














