रत्नागिरी : परिसरातील पालापाचोळा गोळा करून शेकोटी घेताना ओढणी व गाऊनने पेट घेतल्यामुळे महिला ६० टक्के भाजली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.
मुमताज मुनवर पाटणकर (वय ५२, रा. आंबवली देवरूख, ता. संगमेश्वर) असे भाजलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १२) सकाळी आंबवली-देवरूख येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुमताज सकाळी घराच्या परिसरातील पालापाचोळा गोळा करून तो पेटवून शेकोटी घेत होती. अचानक तिच्या ओढणीने व गाऊनने पेट घेतला. त्यामध्ये ती ६० टक्के भाजली. तत्काळ तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 13/Nov/2025














