Khed : पेट्रोल पंपासमोर क्रेनला धडकून स्वार जखमी

खेड : तालुक्यातील लोटे येथील एच. पी. पेट्रोल पंपासमोर क्रेनला धडक दिल्याने मोटारसायकलस्वार दत्ताराम बारकू मोहिते (वय ३०, रा. कोचरी-डफळेवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) हे जखमी झाले. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सव्वाएकच्या सुमारास अपघात घडला.

क्रेनचालक आरोपी अवधेशकुमार राजेंद्र चौहान (२६, रा. गुलबर्गा, बिहार, सध्या रा. लोटे, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील लोटे एच. पी. पेट्रोल पंपासमोर चिपळूण ते खेड मार्गावर आरोपी क्रेनचालक अवधेशकुमार चौहान याने त्याच्या ताब्यातील क्रेन (क्र. जीजे १६ एच २९६६) ही खेड दिशेला तोंड करून अर्ध्या रस्त्यात धोकादायक स्थितीत उभी करून ठेवल्याने पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलवरील (क्र. एमएच ०४ जे वाय ८६९७) चालक दत्ताराम बारकू मोहिते यांची या क्रेनच्या पाठीमागील बाजूस जोराची धडक लागली. त्यांच्या डोक्याला तसेच चेहऱ्याला किरकोळ व गंभीर दुखापती झाल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:02 PM 13/Nov/2025