रत्नागिरी : रत्नागिरी परिसरात खगोल विषय आवड निर्माण करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या खगोलप्रेमी रत्नागिरी या ग्रुपची सभा नुकतीच श्रीमान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण येथे पार पडली. भविष्यात रत्नागिरीत खगोलविषयक नवनवीन उपक्रम व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीसाठी खगोल कार्यकर्ते उपस्थित होते. भविष्यामध्ये रत्नागिरी येथे खगोल विषय जनमानसात व विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. बाबासाहेब सुतार यांनी प्रस्तावना केली. पुणे येथील ज्योतिर्विद्या परिसंस्थेत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या सुहास गुर्जर यांनी उपक्रम कसे करता येतील याची माहिती दिली. उपेंद्र बापट व डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी विविध कल्पना मांडल्या. मुरकर, अतुल बडे यांनी आपल्या खगोलविषयक उपक्रमांची माहिती दिली. निखिल पावसकर, श्रेयस रसाळ, मयुरेश तांबे तसेच विजयकुमार रानडे यांनीही मते मांडली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 13/Nov/2025














