Ratnagiri : जयस्तंभ सर्कल नूतनीकरणाला ट्रकची धडक

रत्नागिरी : शहरातील जयस्तंभ येथील सर्कलचे गतवर्षी नूतनीकरण करण्यात आले होते. या सर्कलला किल्ल्याच्या बुरुजांचा आकार देऊन जयस्तंभाचे सुशोभीकरण केले होते; मात्र मंगळवारी (ता. ११) सायंकाळी फिनोलेक्सकडून येणाऱ्या एका ट्रकने हा सुशोभीकरण केलेल्या कठड्याला धडक दिली.

कठडा तुटला; मात्र जयस्तंभ सर्कलचे हायमॅक्स उशिरा लागत असल्यामुळे या काळोखाचा फायदा घेऊन ट्रकचालकाने कठड्याला धडक देऊन पलायन केले. हा प्रकार ट्रॅफिक पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या ट्रकचालकाचा फोटो काढला आहे. या कठड्याची नुकसानभरपाई त्या वाहतूक कंपनीकडून घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 13/Nov/2025