देवरुख : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष संगमेश्वर, संघर्ष प्रभाग संघ कोसुंब, कुटुंब एनआरओ केरळ यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यमापन कार्यशाळा नुकतीच झाली.
प्रभाग समन्वयक महेंद्र जाधव यांनी प्रस्तावना केली. धामापूर गावातील मत्स्य आरोटी अविनाश शिगवण, कोसुंब आदर्श बालसभा पदाधिकारी सलोनी नंदकुमार कांबळे, प्रियांका जाधव यांनी यात सक्रिय सहभाग घेतला. नांदळज आराध्य ग्रामसंघ अध्यक्ष प्रेरणा रहाटे, तळेकांटे संघ अध्यक्ष सुवर्णा गुरव, तळेकाटे सरपंच सुषमा बने, धामापूरतर्फे देवरुख सरपंच सुहासिनी पाताडे, जिल्हा संसाधन व्यक्ती नुजत नाखाडे, तालुका अभियान व्यवस्थापक रूपेश चव्हाण, तालुका व्यवस्थापक युवराज राठोड यांनी मार्गदर्शन केले.
गॅलरी वॉक या उपक्रमाद्वारे प्रभाग संघाने गेल्या दोन वर्षांतील कार्याचा चार्ट स्वरूपात आकर्षक सादरीकरण केले. सर्व उपक्रमाचे मूल्यमापन करण्यात आले. संघर्ष प्रभागसंघाच्या अध्यक्ष श्रुती लोध यांनी या प्रकल्पाच्या अनुषंगाने, तसेच एकंदरीत प्रभागातील कामकाजाबाबत माहिती दिली. सचिव विशाखा घाग यांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:36 PM 13/Nov/2025














