राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत चौथ्या दिवशी नगरसेवक पदासाठी १ अर्ज दाखल करण्यात आला. हा अर्ज राकेश सुनिल खटावकर (वरचीपेठ राजापूर) यांनी प्रभाग ४, ब मधून अपक्ष म्हणून सादर केला आहे.
गेल्या चार दिवसांत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी दाखल झालेला हा एक अर्ज असे दोन उमेदवार रिंगणात दाखल झाले आहेत. राजापूर नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर असून आता उर्वरित दिवसांत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले जातील हे निश्चित आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 14/Nov/2025














