Ratnagiri : जयगड-गणेशवाडी रस्त्यावर मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : जयगड-गणेशवाडी जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वा. सुमारास करण्यात आली. हरिश्चंद्र रहाटे (६३, रा. तेलीवाडी सांडेलावगण, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्या विरोधात पोलिस शिपाई रजनिकांत मोहन घवाळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी सायंकाळी संशयित हा मौजे साखहर बौद्धवाडी ते गणेशवाडी जाणाऱ्या रत्याच्या बाजूला आपल्याकडे दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना दारू पित असताना ही कारवाई करण्यात आली. संशयिताविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 14/Nov/2025