जाकादेवी येथे प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : जाकादेवी येथे प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना दि. ११ नोव्हेंबर रोजी रात्री १० वा. जाकादेवी येथील जानकी नर्सिंग होम येथे घडली. संदीप गंगाराम मायंगडे (४७, रा. तरवळ, मायंगडेवाडी, रत्नागिरी) असे मृत्यू मयताचे नाव आहे. मंगळवारी संदीप मायंगडे हा सायंकाळी ७ वा. कामावरून घरी आल्यानंतर अचानक खुर्चीवरून खाली पडल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला जानकी नर्सिंग होम येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संदीपला तपासून मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 14/Nov/2025

cake of the day