रत्नागिरी : बेकायदेशिरपणे गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई १२ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वा. मांडवी चौपाटी ते नाईक फॅक्टरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. सुयोग दत्ताराम राऊत (२३, रा. तेलीवाडी, मालगुंड, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
त्याच्या विरोधात पोलिस कॉन्स्टेबल अमृत औघडे यांनी दिलेल्या तक्राररीनुसार संशयित हा मांडवी चौपाटी ते नाईक फॅक्टरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८-बीबी-६०७१) मधून ८०० रुपयांचा १० देशी दारुच्या बाटल्यांची वाहतूक करताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून ६० हजारांची दुचाकी आणि ८०० रुपयांची दारु असा एकूण ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयिताविरोधात दारूबंदी कायदा कलम ६५ (ई), ८२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 14/Nov/2025














