MahaYuti : नगर पंचायत निवडणुकीसाठी देवरुखात आज महायुतीतर्फे अर्ज दाखल

देवरुख : येथील नगर पंचायत निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. १४ नोव्हेंबरला महायुतीकडून नगराध्यक्ष पदासह सुमारे १० नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनाने पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सादर होणार आहेत.

सकाळी ११ वा. ग्रामदेवता सोळजाई देवीचा आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये यांनी दिली आहे. निवडणूक प्रचाराचा शुभारंभासाठी पालकमंत्री यांच्यासोबत आमदार शेखर निकम, राजापूर आमदार किरण सामंत, भाजपाचे नेते प्रशांत यादव, निवडणूक संघटक प्रमोद अधटराव उपस्थित राहणार आहेत. ग्रामदेवता सोळजाई देवी मंदिरात नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार व महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ वाढविला जाणार आहे. यानंतर नगराध्यक्षपद उमेदवार मृणाल शेट्ये व १० नगरसेवकपदाचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 14/Nov/2025