Dapoli : दापोली उदयनगर परिसरातून मायलेक झाले बेपत्ता

दापोली : दापोली येथील उदयनगर परिसराततील उर्मिला आपारमेंट येथे भाडे तत्वावर राहणारी श्रुती सुरज निवळकर वय वर्ष २८ आणि समर्थ सुरज निवळकर वय वर्ष दोन हे दोघेही १८ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा अकरा वाजल्यानंतर घरातून बाहेर पडून गेले ते घरी परतलेच नाहीत. परिसरात तसेच सर्व नातेवाईक यांच्याकडे शोध घेतल्यानंतर सहा नोव्हेंबर रोजी सुरज निवळकर यांनी दापोली पोलीस स्थानकात आपली पत्नी व मुलगा (माय लेक) बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.

Gim trainer

बेपत्ता महिलेच्या गळ्यावर नागासारखी जन्मखुण आणि उजव्या भुवईच्यावर देवीरोगाच्या खुणा आहेत. या दोघांना कोणी पाहिले असल्यास, अथवा कोठे आढळून आल्यास दापोली पोलीस स्थानक येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 14/Nov/2025

tata motars