खेड : भारतीय जनता पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण संघटनात्मक फेरबदल करण्यात आले असून रत्नागिरी उत्तर जिल्हा संयोजकपदी वैभव खेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी या नियुक्तीचे पत्र खेडकर यांना दिले आहे. रत्नागिरी उत्तर जिल्ह्यातील चिपळूण नगरपरिषद, खेड नगरपरिषद आणि गुहागर नगरपंचायत या तीनही ठिकाणच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे उमेदवार विजयी व्हावेत यासाठी ते कार्यकर्त्यांना एकत्र करून संघटनबळ वाढवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पत्राद्वारे म्हटले आहे की, “आपण आपल्या संघटन कौशल्याने सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम कराल, असा मला पूर्ण विश्वास आहे.” या नियुक्तीबद्दल वैभव खेडकर यांना रत्नागिरी तसेच संपूर्ण कोकण विभागातील भाजप कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाच्या शुभेच्छा मिळत असून, आगामी निवडणुकांत पक्षाला भक्कम यश मिळवून देण्यासाठी ते सक्रिय भूमिका बजावतील, अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 14-11-2025














