Ratnagiri : ‘गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभागातर्फे १६ नोव्हेंबर रोजी भवानीगड संवर्धन मोहीम

रत्नागिरी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या रत्नागिरी विभागाच्या वतीने १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता भवानीगड (ता. संगमेश्वर) येथे संवर्धन मोहीम राबविण्यात येणार आहे. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे सकाळी ६.३० वाजता सर्व मावळ्यांनी एकत्र यायचे आणून, येथून भवानीगडकडे प्रयाण केले जाणार आहे. मोहिमेसाठी येताना एक शोल्डर बॅग, चांगली पादत्राणे, बूट अत्यावश्यक आहेत. वैयक्तिक औषधे तसेच १ ते २ लिटर पाण्याची बाटली, जेवणाचा डबा/अल्पोपहार सोबत ठेवायचा आहे.

अधिक माहितीसाठी 9920905920/7666708201/8379012347 या क्रमांकांवर संपर्क साधावा. जास्तीत जास्त मावळ्यांनी व रणरागिणींनी मोहिमेला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 14/Nov/2025

JMBR ACADEMY – ADMISSIONS OPEN!