Khed : घरात पडून जखमी झालेल्या वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

खेड : घरात पडून जखमी झालेल्या वृद्धाला उपचारांसाठी डेरवण येथील रुग्णालयात दाखल केले असता अचानक तब्येत बिघडून त्यांचा मृत्यू झाला. लक्ष्मण धोंडू पाटील (वय ६९, रा. भोस्ते-पाटीलवाडी, खेड) असे त्यांचे नाव आहे.

ही घटना रविवारी (९ नोव्हेंबर) रोजी घडली. लक्ष्मण पाटील हे घरात पडल्याने त्यांच्या डाव्या पायाला फॅक्चर झाले होते. त्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तिथे त्यांचा मृत्यू झाला. याबाबत खेड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 14/Nov/2025