खेड : खेड नगरपरिषद निवडणुकीत आज महायुतीकडून महायुतीचे उमेदवार सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी प्रभाग क्रमांक 6 मधून आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल झाले तेव्हा त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. प्रभागातून आलेल्या महिला, युवक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावत ताकद दाखवली.
अर्ज दाखल करताना पप्पू चिकणे यांनी पत्रकारांशी संवाद साधत सांगितले की, स्थानिक पातळीवरील प्रलंबित प्रश्न सोडवणे, मूलभूत सुविधा पुरवणे आणि वॉर्डातील विकासकामांना गती देणे हे आपल्या कामकाजाचे प्रमुख ध्येय राहणार आहे. नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला आपण पात्र ठरू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान त्यांच्या उमेदवारी अर्जामुळे प्रभाग क्रमांक 6 मधील निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. अर्ज दाखल करतेवेळी अँड. संदेश चिकणे, तुषार सापते, शहरप्रमुख कुंदन सातपुते, राजेश बुटाला यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून पप्पू चिकणे यांना पाठिंबा दर्शवला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:17 PM 14/Nov/2025














