Guhagar Nagar Panchayat Election | गुहागरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी पाचव्या दिवशी पहिला अर्ज दाखल

गुहागर : गुहागर नगरपंचायतमध्ये अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी अखेर पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. नगराध्यक्ष पदासाठी अॅड. सुप्रिया वाघधरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी दिली.

सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने नगराध्यक्ष पदासाठी महिला उमेदवार प्रत्येक पक्ष शोधत आहे. पाचव्या दिवशी याठिकाणी पहिला उमेदवारी अर्ज भरण्यात आला. मात्र, तोदेखील अपक्ष उमेदवाराने भरल्याने अद्यापही राजकीय पक्ष उमेदवारी दाखल करत नसल्याने त्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:01 AM 15/Nov/2025