रत्नागिरी : शहरातील घुडेवठार येथे किरकोळ कारणातून टेम्पो चालकाला मारहाण केली. ही घटना गुरुवार १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वा. सुमारास घडली. याप्रकरणी तीन संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर घुडे (रा. घुडेवठार, रत्नागिरी), बाबू घुडे, आणि एक अज्ञात अशा तीन जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्या विरोधात गौरव सदानंद चव्हाण (४०, रा. कर्ला भंडारवाडी, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी गौरव चव्हाण हे आपल्या ताब्यातील कॅरी टेम्पो (एमएच-०८-ऐपी-३७३२) मध्ये माळनाका येथील दुकानातून माल भरुन, सोबत क्लिनर नरेश थापा व हमाल संदीप पाटील यांना घेउन घुडेवठार येथील गोवेकर यांच्या दुकानात माल खाली करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सुधीर घुडे या रिक्षाचालकाने त्या ठिकाणी येउन काही दिवसांपूर्वी फिर्यादीची गाडी त्याच्या रिक्षेला लागल्याचा राग मनात धरुन हातांच्या बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सुधरी घुडे तिथून निघून गेला.
काही वेळाने तो आपल्या रिक्षेतून अन्य दोघांना घेउन त्या पुन्हा त्या ठिकाणी आला. यावेळी संशयित बाबू घुडेने आपल्या हातातील लोखंडी कड्याने गौरव चव्हाण यांना मारहाण केली. यात गौरव चव्हाण खाली पडल्यावर संशयित तिघांनीही त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी फिर्यादीसोबत असलेले क्लिनर आणि हमाल हे त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडले असता संशयितांनी त्यांनाही मारहाण व शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 15/Nov/2025














