Khed : गुणदे तलारीवाडी येथे वृद्धावर गावठी हातभट्टीच्या दारूप्रकरणी कारवाई

खेड : तालुक्यातील गुणदे तलारीवाडी येथे अवैध गावठी हातभट्टी दारू साठवून विक्रीसाठी ठेवणाऱ्या ६९ वर्षीय व्यक्तीवर खेड पोलिसांनी कारवाई करत मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी दि. १३ रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता करण्यात आली.

खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार सुहास हिंदुराव पाटील यांनी तक्रार नोंदवली. अटक आरोपीची ओळख गंगाराम विठोबा बावदाने (वय ६९, रा. गुणदे तलारीवाडी, ता. खेड) अशी आहे. याबाबत पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 15/Nov/2025