Ratnagiri Gogate-Jogalekar College : तंबाखूमुक्त उपक्रमात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी घेतली शपथ

रत्नागिरी : शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम रत्नागिरी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त युवा शपथ घेण्यात आली. एनटीपीसी समुपदेशक प्राची भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थी व तरुणांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागृती निर्माण करणे आणि आरोग्यदायी, व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश देणे हे होते. एन.एस. एस. विभागाचे माजी विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयस रसाळ याने सर्वांना शपथ दिली. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांचा वापर न करण्याची आणि समाजात तंबाखूमुक्त वातावरण निर्मितीची शपथ घेतली. ‘तंबाखूमुक्त भारत-निरोगी भारत’ या घोषवाक्याने कार्यक्रमाला उत्साही प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी एन.एस.एस. विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सचिन सनगरे, एनटीपीसी समुपदेशक प्राची भोसले, सामाजिक कार्यकर्ते सचिन भरणे, जिल्हा मानसिक आरोग्य कर्मचारी श्वेता मांजरेकर व एन.एस.एस. स्वयंसेवक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 15/Nov/2025