Ratnagiri : एमआयडीसी परिसरात गावठी दारू विकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : शहरानजीकच्या एमआयडीसी परिसरात एका कंपनीच्या प्लॉटच्या भिंतीच्या आडोशाला गावठी दारु विक्रीसाठी बाळगणाऱ्या महिले विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.४५ वा. सुमारास करण्यात आली.

Gim trainer

या बाबत महिला पोलिस कॉस्टेबल सुप्रिया मनोज लिंगायत यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित महिला बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टीची ९५० रुपयांची ९ लिटर दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. तिच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 15/Nov/2025

JMBR ACADEMY – ADMISSIONS OPEN!