लांजा : नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी (ता. १४) पाचजणांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले. गुरुवारपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नव्हता. सर्वच राजकीय पक्षांकडून अद्यापही उमेदवारांची घोषणा झाली नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली, तरीही पाच दिवसांच्या कालावधीमध्ये आज पाचजणांनी नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. नगराध्यक्षपदासाठी अद्यापपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही. एकाहून अधिक इच्छुकांची संख्या असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आणि विशेषतः शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारांची नावे अद्यापही घोषित करण्यात आलेली नाहीत.
महाविकास आघाडीकडून काही उमेदवार निश्चित करण्यात आले असले तरी अधिकृतपणे कोणत्याही पक्षाने उमेदवार जाहीर केलेले नाहीत. पक्षनेतृत्वाकडून उमेदवार जाहीर करण्याबाबत दिरंगाई होत असल्याने इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. त्यांच्यामध्ये धाकधूक वाढली आहे. कमी कालावधीमध्ये मतदारांपर्यंत पोहोचायचे कसे, असा प्रश्न इच्छुक उमेदवारांसमोर निर्माण झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 15/Nov/2025














