General Election 2025 : मतदान वाढीसाठी र.न.प.कडून विविध उपक्रम

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील मतदान वाढावे यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. पहिल्या टप्यात रत्नागिरी शहरात मतदानाला प्रवृत्त करणाऱ्या घोषवाक्यांचे फलक लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर घंटागाड्यांवरील ध्वनीक्षेपकावरुन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत ६४ हजार ७४६ मतदार आहेत. या मतदारांना १६ प्रभागातून ३२ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील फलक, घंटागाड्यांवरून मतदानाचे आवाहन करण्याबरोबर समाजमाध्यमांचाही वापरत केला जात आहे. महाविद्यालयांमध्ये जाऊनही तरुणांना मतदानासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. बाइक रॅलीचेही नियोजन केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 15/Nov/2025