रत्नागिरी: रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीची (Ratnagiri Municipal Election 2025) रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या, सोमवार (दिनांक १७ नोव्हेंबर) हा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसापूर्वी, आज (रविवार, दि. १६) अर्ज भरण्यासाठी मोठी झुंबड उडाली.
आज दुपारी ३ वाजेपर्यंत, एकाच दिवशी २४ उमेदवारांनी आपापले नामनिर्देशनपत्र दाखल केले. काल (१५ नोव्हेंबर) अखेर २० अर्ज दाखल झाले होते. यामुळे आता नगरसेवक पदाच्या ३२ जागांसाठी दाखल झालेल्या एकूण अर्जांची संख्या ४४ वर पोहोचली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी ‘आप’ची थेट एन्ट्री
या निवडणुकीतील सर्वात मोठी घडामोड म्हणजे, थेट नगराध्यक्ष पदासाठी (Direct Mayor Election) आज पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) कडून श्रीमती सुस्मिता सुहास शिंदे यांनी थेट नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची लढतही आता रंजक ठरणार आहे.
पक्षीय बलाबल (१६ नोव्हेंबर अखेर)
आज अखेर दाखल झालेल्या ४४ अर्जांमध्ये, शिवसेनेचे (Shiv Sena) सर्वाधिक १३ अर्ज आहेत. त्यापाठोपाठ अपक्ष (Independent) म्हणून ११ जणांनी अर्ज भरले आहेत. आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटानेही ५ अर्ज भरत, तर ‘आप’ने ६ नगरसेवक पदासाठी अर्ज भरत जोरदार एन्ट्री केली आहे.
पक्षनिहाय दाखल एकूण अर्ज (नगरसेवक):
- शिवसेना: १३
- अपक्ष: ११
- आम आदमी पार्टी (आप): ०६ (आणि १ नगराध्यक्ष)
- भारतीय जनता पक्ष (भाजप): ०६
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे): ०५
- प्रहार जनशक्ती पक्ष: ०२
- एकूण: ४४
आज (१६ नोव्हेंबर) दाखल झालेले अर्ज (एकूण २४)
अपक्ष – ७
- चवंडे अस्मिता सुशील – १५ अ
- मयेकर मैथिली देवेंद्र – १२ अ
- वालम अनिकेत अनिल – १ ब
- काझी सायमा नदाफ – ४ अ
- कदम मंजुळा विजय – ५ ब
- कदम सरिता जितेंद्र – ५ ब
- बेग कामना अरुण – ९ ब
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) – ५
- सावंत प्रसाद सुरेश – ३ ब
- शिवलकर राजश्री बिपीन – १५ अ
- पावसकर साजीदखान अकबरखान – ८ ब
- विलणकर अमित वसंत – १५ ब
- हकीम नाझनीन युसुफ – ९ ब
भाजपा – १
- जाधव नितीन लक्ष्मण – १ ब
शिवसेना – ४
- पिलणकर जागृती राहूल – १२ अ
- पाटील सायली विकास – ९ ब
- कीर संतोष विजय – १४ ब
- सोलकर नाहिदा तन्वीर – ८ अ
आम आदमी पार्टी – ७
- वस्ता खलील नुरुद्दीन – १६ ब
- वस्ता रेहाना खलील – १६ अ
- झारी रमीज इसाक – १ ब
- खान तमन्ना करीम – ९ ब
- नावडे रुक्साना लियाकत – १ अ
- मजगावकर नफिसा मोहम्मद – ४ अ
- शिंदे सुस्मिता सुहास – थेट नगराध्यक्ष पदाकरिता
यापूर्वी दाखल झालेले अर्ज (एकूण २०)
दिनांक १५/११/२०२५ रोजी प्राप्त नामनिर्देशन पत्र – १७
- प्रहार जनशक्ती पक्ष – १ (केसरकर सोनाली महादेव – २ अ)
- शिवसेना – ९ (हळदणकर श्रद्धा संजय – ७ ब, होडेकर आफरीन ओबेदुल्लाह – १३ अ, नायर निमेश विजय – २ ब, भारती गणेश कमलाकर – ७ अ, मलुष्टे सौरभ सुरेश – ५ अ, साळवी दत्तात्रय विजय – ८ ब, शेट्ये राजन रामकृष्ण – ३ ब, साखरकर सुहेल अब्दुल लतीफ – १३ ब, खेडेकर विजय गोविंद – ९ अ)
- भाजपा – ५ (रसाळ सुप्रिया संदिप – ११ ब, तिवरेकर समीर जगन्नाथ – ११ अ, करमरकर मानसी सचिन – १० अ, ढेकणे वर्षा परशुराम – १५ अ, तोडणकर राजेश कृष्णा – १० ब) S* अपक्ष – २ (चवंडे संकेत सुगंध – १५ ब, वस्ता शाहीद समीर – ८ ब)
दिनांक १४/११/२०२५ रोजी प्राप्त नामनिर्देशन पत्र – १
- प्रहार जनशक्ती पक्ष – १ (हळदवणेकर योगेश यशवंत – २ ब)
दिनांक १२/११/२०२५ रोजी प्राप्त नामनिर्देशन पत्र – २
- अपक्ष – २ (बावानी मतीन याकुब सत्तार – ३ ब, बावानी हीना मतीन – ३ ब)
उद्या ‘बंडखोरी’चा दिवस?
उद्या (सोमवार) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने, महायुती आणि महाविकास आघाडीकडून उर्वरित उमेदवारांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळणार नाही, असे अनेक ‘नाराज’ उमेदवार बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उद्याचा दिवस हा ‘बंडखोरांचा वार’ ठरण्याची चिन्हे आहेत.














