Sangameshwar : कळंबस्ते साटलेवाडीत दारूविक्री करणाऱ्यावर गुन्हा

रत्नागिरी : कळंबस्ते (ता. संगमेश्वर) येथील विरतवाडी रस्त्याच्या बाजूला आडोशाला हातभट्टीची दारूविक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ८५० रुपयांची ८ लिटर दारू जप्त केली. संशयिताविरुद्ध संगमेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. उमेश तुकाराम शिंदे (वय ५० कळंबस्ते-साटलेवाडी, संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १५) सायंकाळी सातच्या सुमारास निदर्शनास आली. या प्रकरणी महिला कॉन्स्टेबल सोनी भोसले यांनी संगमेश्वर पोलिसांत तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 17/Nov/2025