रत्नागिरी : जयगड समुद्रात मच्छीमारी करणाऱ्या बोटीवर झोपलेल्या नेपाळी खलाशाची हालचाल कर, होत नसल्यामुळे उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. रोहित जंगबहादुर चौधरी (४७, रा. कैलाला, बरे, नेपाळ) असे मृत्यू झालेल्या नेपाळी खलाशाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १४) पहाटे तीनच्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत रोहित चौधरी हे बोटमालक नितीश तारानाथ नायक ती यांच्या बोटीवर कामाला होते. गुरूवारी (ता. १३) ला जयगड येथील समुद्रात मच्छीमारी करत असताना बोटीवरील खलाशी रोहित चौधरी हा रात्री नऊ वाजता जेवण आटोपल्यावर बोटीवरील केबिनमध्ये झोपला होता.
त्यानंतर शुक्रवारी पहाटे बोट मच्छीमारी करून मिरकरवाडा बंदरात आली तेव्हा बोटीवरील फोरमन राजेश धनिराम डंगौराने बोटीच्या केबिनमध्ये झोपलेल्या रोहित चौधरीला हाक मारून उठवले; परंतु तो उठला नाही म्हणून त्याने केबिनमध्ये जाऊन त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याची कोणतीही हालचाल होत नव्हती. याबाबत राजेश डंगौराने बोटमालक नितीश तारानाथ नायक यांना माहिती दिली. त्यांनी मिरकरवाडा बंदरात येऊन रोहितला शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 17/Nov/2025














