Devrukh : चाफ्याचा पऱ्या येथील जंगलमय भागात हातभट्टीच्या दारूवर पोलिसांचा छापा

रत्नागिरी : देवरूख (संगमेश्वर) येथील पोलिसांनी विनापरवाना गावठी हातभट्टीची दारूवर मोठी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ लाख २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देवरुख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायण रावजी पर्शराम (वय ६०, रा. पर्शरावाडी, देवरुख ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १५) दुपारी पावणेतीनच्या सुमारास देवरुख-पर्शरामवाडी येथील चाफ्याचा पऱ्या या ठिकाणी जंगलमय भागात निदर्शनास आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 17/Nov/2025