संगमेश्वर : घरडा केमिकल संगम, ज्येष्ठ नागरिक संघ आणि लायन्स क्लब संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संगमेश्वर येथील शिबिरात ६० ज्येष्ठ नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या. उपस्थित वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणीत सहभागी झालेल्या नागरिकांना आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. याशिवाय दहा ज्येष्ठ नागरिकांची ईसीजी तपासणी विशेषतः करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या वेळी ग्रामपंचायत नावडीच्या सरपंच सौ. प्रज्ञा कोळवणकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष श्री. उदय संसारे, प्रमोद शेट्ये, विनायक पाथरे, शिरगावकर, दादा कोळवणकर, तसेच लायन्स क्लब संगमेश्वरचे अध्यक्ष रविकांत शिंदे आणि जेष्ठ लायन विवेक शेरे, मनीष चोचे उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांना योग्य वेळी आरोग्यसेवा मिळावी यासाठी संस्थांनी पुढाकार घेतल्याबद्दल उपस्थितांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 17/Nov/2025














