राजापूर : शहरातील विविध भागामध्ये गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा मुक्तपणे संचार सुरू असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील समर्थनगर भटाळी परिसरामध्ये शनिवारी (ता. १५) रात्री लोकवस्तीमध्ये मुक्तपणे फिरणारा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
बिबट्याचा नेमका वावर कोणत्या भागामध्ये जास्त प्रमाणात आहे याची माहिती घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही शहराच्या काही भागामध्ये बसविण्यात आले होते. त्या कॅमऱ्यांमध्ये बिबट्या कॅमेराबद्ध झालेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये बिबट्याची दहशत कायम असताना बिबट्याने आपला मोर्चा गेल्या काही दिवसांपासून दिवटेवाडी, ओगलेवाडी, साखळकरवाडीसह धोपेश्वर परिसराकडे वळविला आहे.
या परिसरामध्ये अद्यापही बिबट्याचा संचार कायम असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी या भागातील लोकांनी यापूर्वीच वनविभागाकडे केलेली आहे. काल रात्री शहरातील समर्थनगर भटाळी परिसरामध्ये लोकवस्तीमध्ये फिरणारा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याची घटना घडली आहे. या बिबट्याचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी लोकांकडून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 17/Nov/2025














