रत्नागिरी : कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये झालेल्या प्रतीकात्मक कामगारांचे हाल गावच्या ओढीने बॉर्डरपर्यंत चालत जाणे याचा कसा संघर्ष करावा लागला याचं ज्लवंत उदाहरण देणारे इम्युनिटी (द वॉइस ऑफ द टॉलरन्स) या नाटकाने रसिकांना अक्षरशः रडवले. यामध्ये बालकलाकार असलेल्या सोहम तोडणकर याची भूमिका लक्षवेधी ठरली.
राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर शुक्रवारी लेखक डॉ. सोमनाथ सोनवलकर व दिग्दर्शक संदेश तोडणकर यांच्या खरेवाडी क्रीडा मंडळ मुंबई मेर्वी रत्नागिरी या संस्थेने इम्युनिटी (द वॉईस ऑफ द टॉलरन्स) हे नाटक सादर केले. उत्कृष्ट संवादफेक त्याच्याच जोडीला अभिनय यामुळे हे नाटक उठावदार झाले. सर्वच कलाकारांनी आपल्या कलेला न्याय दिला. येथील अनेक प्रसंग भावनिक दाखवल्याने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आले होते.
मुंबईतील बिल्डिंगचे काम सुरू असते. शिवा, कमी, बिरजू, लक्ष्मी, कलवा, छैनू, मारु, सलीम, सज्जन, चंपकचाचा, गजोधर, सुनीता इत्यादी कामगार आपल्या पत्र्याच्या घरात राहत असतात. मुंबई पाहण्यासाठी दोन छोटी मुले बहादूर व मुन्नी मुंबईला येतात.
सुनीताचे छोटे बाळ असते. एक दिवस मुकादम सर्वांचे कामाचे पैसे देतो. काम चालू असताना लॉकडाऊन जाहीर होते. त्यामुळे काम बंद होते. त्यानंतर कामगारांची उपासमार व्हायला सुरुवात होते. सर्वांमध्ये भांडण सुरू होतात. अशातच कंमो गरोदर असते. कलवाला कोरोनाची लागण होते. जोरदार खोकला आणि दम लागून प्राण सोडतो. त्यानंतर कामगार बडनेरला आपल्या गावी जायला निघतात. मुकादम त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो. बिरजू व शिवा यांच्यात वादावादी सुरू होते. शिवा बरोबर सर्व कामगार तसेच बिरजू नाईलाजाने चालत घरी गावाला जायला निघतात. रस्त्यात पोलिस अडवतात आणि झोडपून काढतात. कामगारांचे रस्ता तयार करण्याचे महत्त्व कंमो पोलिसांना पटवून देते. चालत जात असताना सर्व खूप थकतात आणि त्यांच्या भाकऱ्या संपतात. शेवटी ७ भाकऱ्या उरतात. शिवा हत्तीचे उदाहरण देऊन कामगारांमध्ये बळ प्राप्त करून देतो. सज्जनच्या पायाला जखम होऊन पॉयझन होते. विष भिनल्यामुळे सज्जनचा मृत्यू होतो. त्याला तिथेच नदीत ढकलून देतात. खायला काही नसल्यामुळे झाडाचा पाला खातात. भूकेमुळे मेलेल्या कुत्र्याचे पाय मारू खातो आणि आपली व्यथा व्यक्त करतो. त्याच वेळी सुनीताचे बाळ मेलेले आहे हे सर्वांना कळते. परंतु मुलाकडे पाहून भाकरी मिळेल म्हणून तिने दोन दिवस तसेच लपवून ठेवते. बाळाला शेवटी पुरण्यात येते.
चालत चालत गावालगतच्या पटरी जवळ येतात. दोन दिवसात गावाला पोहोचू असे त्यांना कळते. रात्र होते म्हणून ट्रेन चालू नसल्यामुळे तिथेच पटरीवर झोपतात. एक मालगाडी ऑक्सीजन भरून नेत असते. ट्रेनच्या आवाजाने शिवा, लक्ष्मी आणि कंमो यांना जाग येते आणि ते बाकीच्याना उठवण्याचा प्रयत्न करतात. परंतु ट्रेनखाली सापडतात. परंतु कंमो, बहादूर, मुन्नी आणि चंपकचाचा वाचतात, पंचनामा करण्यासाठी पोलिस, आरोग्यकर्मचारी आणि वार्ताहर येतात. मुकादम सुद्धा बातमी समजल्यावर येतो. काम सुरु होण्याची परवानगी मिळते. परंतु कंमो आता यापुढे रोजनदारी करणार नाही अस सांगते. अशातच तिला कळा येऊ लागतात. चंपकचाचा, बहादूर आणि मुन्नी आडोसा तयार करतात. कंमो बाळंत होते आणि तिला मुलगा होतो. त्याचवेळी बहादूर, मुन्त्री चंद्रापर्यंत रस्ता तयार करणे आणि यापुढे शिक्षण घेणे याचे महत्व सांगतात. शिवाचे शब्द कंमोला आठवतात. ‘सपान पाय, मोठ्ठ सपान’. कंमो शिकवून बाळाला मोठे करणार, अशी प्रतिज्ञा करते.
या नाटकात शिवा संदेश तोडणकर, बिरजू आशिष सावंत, चंपक चाचा शंकर वरद, छैनू – वैभव लिंगायत, मारू – शैलेश खरडे, कलवा विनय साठे, सलीम विजय गुरव, सज्जन – साहिल वारीशे, गजोधर-योगेश खरडे, बहादूर सोहम तोडणकर, मुकादम – राजेश गुरव, मुन्नी – गार्गी नवाले यांनी काम केले. तर निर्माता अथर्व थिएटर्स, प्रकाश योजना अभिजीत डोंगरे, पार्श्वसंगीत – योगेश मांडवकर, नेपथ्य ऋषी आर्टस्, रंगभूषा – नरेश पांचाळ तर वेशभूषा – विश्वनाथ नवाले यांनी काम पाहिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 17/Nov/2025














