‘कामाचा’ दांडगा अनुभव, ‘मतदारांशी’ थेट संपर्क; पूजा पवार यांचा प्रभाग ५ मधून विजयाचा ‘विश्वास’

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी (Ratnagiri Municipal Election) उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी (दि. १७ नोव्हेंबर), प्रभाग क्रमांक ५ मधून सौ पूजा पवार (Pooja Pawar) यांनी शिवसेनेकडून (Shiv Sena) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, पूजा पवार यांनी आपल्या प्रभाग ५ मधील शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल केला. यावेळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

“निवडणूक आली की अनेकजण जागे होतात”

यावेळी बोलताना पूजा पवार यांनी आपल्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “निवडणूक आली की अनेकजण जागे होतात आणि उमेदवारी अर्ज दाखल करतात. मात्र मी तशी ‘हंगामी’ उमेदवार नाही. मी मागील अनेक वर्षांपासून माझ्या प्रभागातील नागरिकांच्या सुख-दुःखात त्यांच्या थेट संपर्कात राहिलेली आहे.”

विकासकामांवर भर, ‘सुज्ञ’ मतदारांवर विश्वास

पूजा पवार यांना त्यांचे पती, प्रसिद्ध उद्योजक दीपक पवार (Deepak Pawar) यांचीही मोलाची साथ लाभत आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि आमदार किरण सामंत (Kiran Samant) यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने, पूजा पवार यांनी गेल्या काही वर्षांत प्रभाग ५ मध्ये अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत.

Jadhav acadamy

“आजवर प्रभागात केलेली हीच विकासकामे आणि नागरिकांशी असलेला जिव्हाळ्याचा संपर्क, हाच आम्हाला विजयापर्यंत नक्की पोहोचवेल. प्रभाग ५ मधील ‘सुज्ञ’ मतदार नक्कीच कामाची पोचपावती देतील आणि मोठ्या मताधिक्याने मला निवडून देतील,” असा विश्वासही पूजा पवार यांनी व्यक्त केला आहे.