Lanja Police Station : लांजा पोलिस ठाण्याचा स्मार्ट पोलिस ठाणे म्हणून गौरव

लांजा : लांजा पोलिस ठाण्याची कार्यपद्धत, परिसर स्वच्छता, व्यवस्थापन व परिसर सुशोभिकरण, नागरी सेवा या उत्कृष्ट नियोजन पद्धतीमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्याहस्ते लांजा पोलिस ठाण्याला स्मार्ट पोलीस ठाणे म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्मार्ट पोलिसिंग, कडक आणि संवेदनशील, आधुनिक आणि मोबाईल, सतर्क आणि उत्तरदायी, विश्वसनीय आणि प्रतिसाद, तंत्रज्ञानाने परिपूर्ण आणि प्रशिक्षित पोलिस दल यांना हे प्रमाणपत्र दिले जाते या सर्व मूल्यांचे पालन करून लांजा पोलिस स्टेशन गुणवत्तेसाठी पात्र ठरले आहे.

त्यामुळे प्रमाणित स्मार्ट पोलिसमध्ये उत्कृष्ट कामगिरी आणि उत्कृष्ट तेसाठी लांजा पोलिस ठण्याने गुणवत्ता प्राप्त केली आहे. लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलिस ठाण्याचा परिसरात स्वच्छता, सुशोभीकरण करून पोलिस ठाण्याचा परिसर लक्षवेधी ठरत आहे. महाराष्ट्र पोलिस प्रशासनाकडून दिलेल्या सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत लांजा पोलिस ठाण्याने नाव लौकिकता प्राप्त केली आहे. लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी सहकऱ्यांसह पोलिस ठाणे इमारतीला नवा दर्जा प्राप्त करून दिला आहे. श्री. बगळे यांनी सात कलमी कार्यक्रमांची अंमलबजावणी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 18/Nov/2025