Sangameshwar : गायीच्या मृत्यूप्रकरणी स्वाराविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील धामणी (ता. संगमेश्वर) येथील रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकी चालवून स्वतःच्या व मागे बसलेल्याच्या दुखापतीस तसेच गायीच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश रामदास चव्हाण (वय ३०, रा. करबुडेफाटा, मुळ : शिवाजीनगर, सोनगिरवाडी, ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.

ही घटना मंगळवारी (ता. ११) रात्री घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित हे दुचाकीवरून सोबत रोहित मोहन चव्हाण यास घेऊन मुंबई ते गोवा महामार्गावरून जात असताना धामणी येथील रस्त्यावर दुचाकी निष्काळजीपणे चालवून मोकाट फिरणाऱ्या गायीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते स्वतः सह दुचाकीच्या मागे बसलेले रोहित चव्हाण यांना दुखापत झाली तसेच या अपघातात गायीच्या मृत्यूस कारणीभूत झाला. याप्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल उत्तम सासवे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 18/Nov/2025

infigo