Rajapur Election : महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी अॅड. हुस्नबानू खलिफेंचा अर्ज

राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी काँग्रेस, शिवसेना उ. बा. ठा., राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास व मनसेच्या महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या माजी आमदार अॅड. सौ. हुस्रबानू खलिफे यानी लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारीच जागा वाटप जाहिर करण्यात आले असून काँग्रेसने नगराध्यक्षपदासह १२ जागांसाठी तर शिवसेना उ. बा. ठा ने ९ जागांवर असे एकूण २१ उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. राजापुरात शक्तीप्रदर्शन करत महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आले.

काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे यांनी प्रभाग क्रमांक सहा मधून तर राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षा सौ. अनामिका जाधव यांनी प्रभाग क्रमांक आठ मधून आपली उमेदवारी दाखल केली आहे. काँग्रेसने सोमवारी जाहिर केलेल्या यादीत सात नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर काँग्रेसच्या अनामिका जाधव व नेहा तानवडे यांना उ. बा. ठा. कडून उमेदवारी मिळाली आहे. उ. बा. ठाकरे गटाने देखील माजी नगरसेवक विनय गुरव वगळता अन्य आठ नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर काँग्रेसकडून सुलतान ठाकूर, सुभाष बाकाळकर व नेहा तानवडे हे पुन्हा एकदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहिर करत त्यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विकास गंबरे यांच्याकडे दाखल केले. याप्रसंगी माजी आमदार गणपत कदम, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जितेंद्र खामकर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, तालुका प्रमुख कमलाकर कदम, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संतोष सातोसे आदींसह आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविकास आघाडीकडून जाहिर करण्यात आलेले व उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार भाग क्रमांक १अरबाज खलीफे काँग्रेस, समिक्षा बंडबे काँग्रेस, प्रभाग क्रमांक २ संगिता चव्हाण उबाठा, अनिल कडाळी उबाठा, प्रभाग क्रमांक ३ विनय गुरव उबाठा, नेहा तानवडे उबाठा, प्रभाग क्रमांक ४ गार्गि चिपटे उबा ठा, सुभाष बाकाळकर -काँग्रेस, प्रभाग क्रमांक ५, शबाना मूल्ला काँग्रेस, सिद्धांत जाधव काँग्रेस, प्रभाग क्रमांक ६, जमीर खलीफे काँग्रेस, आफरोज झारी काँग्रेस, प्रभाग क्रमांक ७, आमीना गडकरी काँग्रेस, सूलतान ठाकुर काँग्रेस, प्रभाग क्रमांक ८, श्रीकांत दुधवडकर – उबाठा, अनामिका जाधव उबाठा, प्रभाग क्रमांक ९ जान्हवी वादक कॉंग्रेस, सुबोध पवार उबाठा, प्रभाग क्रमांक १०, नुरमहंमद मुजावर काँग्रेस, नसीमा याहू उ.बा. ठा यांना उमेदवारी जाहिर झाली असून त्यांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 18/Nov/2025