Horoscope: आजचे राशीभविष्य – १९ नोव्हेंबर २०२५

मेष – वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला आहे. जोडीदारासह वैवाहिक जीवनाचा आनंद सुद्धा उपभोगू शकाल. आर्थिक लाभ तसेच प्रवास संभवतात. राग व अधिकार गाजविण्याची भावना वाढेल.

वृषभ – आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल. नियोजनाप्रमाणे सर्व कामे पार पडतील. आर्थिक लाभ संभवतात.

मिथुन – आज वैवाहिक जोडीदार व संतती ह्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. शक्यतो वाद – विवाद व बौद्धिक चर्चे पासून दूर राहावे. मानहानी संभवते. मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे.

कर्क – आज ग्लानीमुळे आपले मन दुःखी राहील. प्रफुल्लता, स्फूर्ती व आनंद यांचा अभाव दिसून येईल. कुटुंबीयांशी मतभेद संभवतात. पैसा खर्च होईल व कामात अपयश येईल.

सिंह – आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. भावंडा बरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. संबंधां मधील भावनांची जाणीव आपणाला होईल.

कन्या – आज कुटुंबातआनंदाचे वातावरण राहील. इतरांशी गोड बोलून आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. वाद होण्याच्या शक्यतेमुळे कोणाशी बौद्धिक चर्चा करणे टाळावे.

तूळ – आज आपण आर्थिक नियोजन व्यवस्थितपणे करू शकाल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. दृढ विचारांमुळे हाती घेतलेले काम पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल. आनंद, हर्ष व मनोरंजनावर पैसा खर्च कराल.

वृश्चिक – आज एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. एखाद्याशी वाद सुद्धा संभवतात. आपल्या वक्तव्याने गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट व मानसिक चिंता यामुळे त्रस्त व्हाल.

धनु – आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनाचा पूर्ण आनंद उपभोगू शकाल. मित्रांसह रम्य ठिकाणी प्रवासास जाण्याचा बेत आखाल. उत्पन्नात वाढ संभवते.

मकर – आज व्यावसायिक कामात आपणाला लाभ होईल. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होईल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आपणास आनंद होईल.

कुंभ – आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र चांगले राहील. शरीरात स्फूर्ती कमी असल्याने काम करण्यात उत्साह वाटणार नाही. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल.

मीन – आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मानसिक व शारीरिक कष्ट अधिक होतील. अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाला जुनी येणी वसूल होतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 19-11-2025