Ratnagiri : कोकणनगर येथे बेकायदेशीर जुगार चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : शहरातील कोकणनगर येथे बेकायदेशीरपणे जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १.५० वा. सुमारास करण्यात आली. रियाज अब्बास मुकादम (५४, रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्या विरोधात पोलिस हेड कान्स्टेबल बाळू पालकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी दुपारी संशयित हा कोकणनगर येथे एका मेडीकलच्या शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशिरपणे मटका जुगार खेळ चालवत असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २ हजार ७३५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अधिक तपास पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 19/Nov/2025