TET EXAM : २३ नोव्हेंबर रोजी होणार टीईटी परीक्षा; जिल्ह्यात ४ हजार ३५१ उमेदवार

रत्नागिरी : राज्य महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा येत्या २३ नोव्हेंबर रोजी होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या परीक्षेसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी पेपर १ ला १ हजार ७६२ तर पेपर २ ला २ हजार ५८९ असे एकूण ४ हजार ३५१ उमेदवार बसणार आहेत.

जिल्ह्यातील एकूण ४ हजार ३५१ उमेदवार या परीक्षेला बसणार असून, त्यांच्यासाठी एकूण १० परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घेतली आहे. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह उमेदवाराचे थम रिडिंगसुद्धा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण यासाठी ३५० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

शिक्षक भरतीसाठी अनिवार्य असलेली ही परीक्षा शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 19/Nov/2025