रत्नागिरी : कै. विजयकुमार वासुदेव आगाशे (वय ८६, रा. बंदररोड, रत्नागिरी) यांचे मंगळवारी निधन झाले. आगाशे यांनी १९६२ ते १९९३ दरम्यान रत्नागिरी पोलिसदलामध्ये सेवा दिली. ते सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून रत्नागिरी पोलिसदलातून सेवानिवृत्त झाले. (कै.) आगाशे यांच्या व त्यांचे कुटुंबीयांच्या इच्छेनुसार, मरणोत्तर देहदान रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले.
आगाशे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. मरणोत्तर देहदानावेळी आगाशे यांचे दोन्ही मुलगे प्रदीप आगाशे व सचिन आगाशे उपस्थित होते. देहदानाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव व शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, कर्मचारी मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, राज पेडणेकर यांनी काम पाहिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 19/Nov/2025














