रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड रहाटागरवाडी येथे घरात बेशुद्धावस्थेत पडलेल्या वृद्धाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
दिलीप शंकर गावडे (वय ६४, रा. रहाटागरवाडी-मालगुंड, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १६) सकाळी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गावडे हे सायंकाळी पाचच्या सुमारास घरातील किचनमध्ये बेशुद्धावस्थेत पडले होते. त्यांना अजित गावडे यांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्यकेंद्र येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 19/Nov/2025














