रत्नागिरी : नाचणे येथील धनज्योती महिला प्रभागसंघातर्फे एकदिवसीय मूल्यमापन व मार्गदर्शन कार्यशाळा कुवारबाव ग्रामपंचायतीत झाली. यामध्ये ग्रामसंघ पदाधिकारी, समुदाय संसाधन व्यक्ती, प्रभागसंघ पदाधिकारी, आशा व अंगणवाडी सेविका, प्रभागस्तरीय प्रतिनिधी तसेच बालसभा प्रतिनिधी सहभागी झाले होते.
कुवारबाव ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्रमाला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांच्यासह महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक आणि पीआरआय-सीबीओ प्रकल्पाचे तालुकास्तरीय संसाधन व्यक्ती यांनी मार्गदर्शन केले. नाचणे प्रभागातील ग्रामपंचायतींमध्ये महिलांचा पंचायतराज उपक्रमांमधील वाढता सहभाग हा अत्यंत सकारात्मक बदल असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 19/Nov/2025














