दापोली : तालुक्यातील सालदुरे येथील खोताची वाडी रिसॉर्ट परिसरात दुचाकीला अनोळखी दुचाकीने दिलेल्या धडकेत दोघे जण जखमी झाले. हा अपघात १५ नोव्हेंबरला सकाळी झाला. याप्रकरणी दापोली पोलिसांनी धून अनोळखी मोटारसायकलस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सालदुरे येथे झालेल्या अपघातात हर्णे येथील पत्रकार राजेश राजाराम लिंगायत आणि त्यांची मुलगी वृंदा वर लिंगायत जखमी झाली आहे. राजेश लिंगायत (वय ४४, रा. हर्णै, दापोली) यांनी पोलिसात तक्रारी दिली आहे. त्यानुसार राजेश दुचाकीने मुलगी वृंदासह खोताचीवाडी रिसॉर्टहून दापोलीच्या दिशेने येत होते. त्या वेळी पाठीमागून आलेल्या अनोळखी मोटारसायकलस्वाराने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात राजेश लिंगायत यांच्या हाताला दुखापत झाली असून, मुलगी वृंदाही किरकोळ जखमी झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:17 PM 19/Nov/2025














