मंडणगड : तालुक्यातील वेसवी परिसरात मुंबई मटका या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जुगारप्रकरणी बाणकोट पोलिसांनी कारवाई करत एकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संदेश पांडुरंग कुळे (वय ४९, रा. बाणकोट किल्ला) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बाणकोट पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई सुनील मोहित (वय ३६) यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, संशयित वेसवी येथील धबधब्याच्या बाजूला असलेल्या झोपडीत गैरकायदा आणि बिगरपरवाना पैसे स्वीकारून जुगार खेळ खेळताना आढळला. घटनास्थळावरून पोलिसांनी ७५२ रुपयांचे जुगार साहित्य ताब्यात घेतले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 19/Nov/2025














