ST BUS : गणेशोत्सव, कार्तिक वारी, दिवाळीत ६४ लाख सवलतधारकांचा लालपरीने प्रवास

रत्नागिरी : सणासुदीत महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या वतीने महिला, ज्येष्ठांसाठी सवलतधारकांसाठी सूट ठेवण्यात आली होती. दीपावली, कार्तिक वारीत मोठ्या प्रमाणात सवलतधारकांनी लालपरीचा आधार घेत प्रवास केला आहे. दिवसेंदिवस महिला, ज्येष्ठांचा प्रतिसाद वाढतच चालला आहे. गणेशोत्सव, कार्तिक वारी, दिवाळीत ६४ लाख सवलतधारकांनी प्रवास केला असून, त्यातून ५२ लाख ९६ हजार ७६८ महिलांनी सर्वाधिक लालपरीतून प्रवास केला आहे. त्यातून रत्नागिरी विभागास १५ कोटी १६ लाख ४६ हजार १०५ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आपले काम करीत असून, प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी नेहमीच तत्पर असते. मागील काही वर्षांपासून महिला, ६५ वर्षांपुढील ज्येष्ठांसाठी तिकिटात ५० टक्के सवलत, तर ७५ वर्ष पुढील ज्येष्ठांसाठी मोफत प्रवास सुरू केला. याचा लालपरीला मोठा फायदा झाला असून दररोज हजारो, लाखो प्रवासी लालपरीतून प्रवास करत आहेत. वाट पाहीन पण लालपरीतून प्रवास करणार, असा निश्चय करून एसटी बसमधूनच सवलतधारक प्रवास करत आहेत.

सवलतधारकांबरोबरच सामान्य प्रवाशांची लालपरी आधार बनत चालली आहे. गणेशोत्सव, दिवाळी, दसरा, भाऊबीज, पाडवा, आषाढी, कार्तिकवारीमध्ये ७५ वर्षांवरील ५ लाख ९४ हजार ९० जणांनी प्रवास केला, तर ६५ वर्षांपुढील ५ लाख ९ हजार ४७७, तर ५२ लाख ९६ हजार ७६८ महिलांनी एसटीतून प्रवास केला असून सणासुदीत तब्बल ६४ लाख महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुणींनी प्रवास केला असून सवलतींचा लाभघेतला असून १५ कोटींहून अधिक उत्पन्न रत्नागिरी विभागास मिळाले आहे. एकंदरीत सणासुदीत राज्य परिवहन विभागाच्या वतीने सवलत योजना सुरू केल्यामुळे सवलतधारकांसाठी लालपरी आधार बनली आहे.

गणेशोत्सव, दसरा, पाडवा, दिवाळी, वारीत सवलतधारकांसाठी योजना सुरूच होती. ६४ लाखांहून अधिक प्रवाशांनी या योजनेचा फायदा घेत लालपरीतून प्रवास केला. त्यामुळे लालपरीला १५ कोटी १६ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक लाभ महिलांनी घेतला आहे- प्रज्ञेश बोरसे,विभाग नियंत्रक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:44 PM 19/Nov/2025