Chiplun General Election : चिपळुणात अपक्ष उमेदवाराची माघार

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतून अपक्ष उमेदवार सौ. तेजस्वी किंजळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. प्रभाग क्र. १४ मधून भाजपमधून उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन तेजस्वी किंजळकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

भाजपा नेते प्रशांत यादव यांनी याची दखल घेत त्यांना विश्वास दिला. त्यावर विश्वास ठेवून तेजस्वी किंजळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २१ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी दाखल केलेल्या अर्जांपैकी दोन दिवसांत कोण माघार घेते याकडे लक्ष लागले आहे. यानंतरच न. प. निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:00 AM 20/Nov/2025